ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्याचे निर्देश   

नांदेड (जिमाका) दि. 29 :-जिल्ह्यातील सर्वसाखर कारखान्याचे संचालकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस वाहतूककरणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर्स, ट्रक बैलगाड्यांनाकापडाचे परावर्तक रिफ्लेक्टीव्हटेप लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारीडॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्ह्यातीलसाखर कारखानदारांचीबैठक जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी रिफ्लेक्टिवटेप परावर्तक लावण्यासाठीसर्व साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांनीसहमती दर्शविली. हे रिफ्लेक्टिव टेपऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनालावल्यामळे रात्री होणारेअपघात अपघातात मृत्यूमूखीपडणाऱ्या लोकांची संख्या कमीहोण्यास मदत होऊ शकते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000