पुसद :-(अकरम चव्हाण) येथील वाशिम रोड असलेल्या हॉटेल जम-जम समोर मोटार सायकल वर आलेल्या दोन अज्ञात इसमानी रोड वर उभ्या असलेल्या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

त्या गोळ्या डोक्यात लागल्या मुळे तरुणाचा मृत्यु झाला. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. इमतियाज असे मृतक तरुणाचे नाव आहे.तयाला लगेच उपचाराकरिता रुगणालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनोळखी हल्लेखोरांनी हे हल्ला केला, पुढील तपास पोलीस करीत आहे.