परभणी, दि.1 (जिमाका) :- पीक कर्ज दि.1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यात आजअखेर एकुण 1 लाख 90 हजार 810 इतक्या पात्र कर्जखात्याच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झलेल्या असून त्यापैकी एकुण 1 लाख 84 हजार 999 खातेदारांनी आधार प्रमाणिकरण केले असून 5 हजार 804 खातेदारांचे आधर प्रमाणीकरण होणे बाकी आहे. यासाठी दि.15 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रलंबित आधार प्रमाणीकरण तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासोबतच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणसाठी सहकारी संस्थेचे तालुका सहाय्यक निबंधक, व जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाशी व बँक शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी केले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News