परभणी, दि. 2 (जिमाका) :- उपसचिव व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुररिक्षण कार्यक्रम प्राप्त झाल आहे. या कार्यक्रमानुसार दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रित मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून आयोगाच्या निर्देशानूसार दावे व हरकती स्विकारण्याचा दि.1 ते 30 नोव्हेंबर हा कालावधी आहे. विशेष मोहिमांचा कालावधीत दि.13 व 14 नोव्हेंबर व दि.27 व 28 नोव्हेंबर 2021 निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त दावे व हरकती दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढण्यात येतील. तर मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार डॉ.संजय बिरादार यांनी केले आहे. -*-*-*-*-