परभणी, दि. 2 (जिमाका) :- सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला दि.1 ते 15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत देण्यासाठी आपण ज्या बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेत आहात त्या बँकेमध्ये जावून हयात असल्याबाबतच्या यादीवर स्वाक्षरी करावी. जिल्हा कोषागारामार्फत सर्व बँकांना हयात दाखल्याबाबतच्या याद्या पाठविण्यात आल्या आहेत. तसेच जीवनप्रमाण या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने हयात प्रमाणपत्र सादर करु शकतात. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुनिता सुंकवाड यांनी केले आहे.