परभणी, दि. 8 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क आणि विधी व न्याय विभाग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि.8 नोव्हेंबर 2021 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने परभणी येथे रात्री 12.30 वाजता आगमन व मुक्काम. मंगळवार दि.9 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता परभणी येथून औंढा नागनाथ जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता बाभुळगाव ता.वसमत येथून शासकीय वाहनाने जिंतूर-जालनामार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील. -*-*-*-*-