वाहन अपघातात जखमी व्यक्तींचे

प्राण वाचविणाऱ्या जीवनदुतांसाठी पुरस्कार 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  रस्ते अपघातात लोक गंभीररित्या जखमी होतात, तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींला तात्काळ मदत मिळावी यासाठी काही व्यक्ती जीवनदूत म्हणून नेहमी कार्यरत असतात. या व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने पुरस्कार घोषित केला आहे. याबाबत अधिक माहिती https://morth.nic.in/ या संकेतस्थळावर दिली आहे. 

ही योजना 15 ऑक्टोंबर पासून सुरु झाली असून या पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये आहे. जिल्ह्यात अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ मदत केली असल्यास अशा व्यक्तींनी Good Samaritans च्या नियम अटीची पूर्तता करुन अपघात स्थळाच्या नजीकचे पोलीस स्टेशनचा, रुग्णालयाचा अहवालासह आपला अर्ज नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000