परभणी, दि. 9 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाची अधिसुचना दि.14 मार्च 2017 अन्वये परभणी जिल्ह्यात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापन करण्यांत आलेली आहे. या समितीमध्ये चार क्षेत्रातील अशासकिय सदस्यांच्या नियुक्ती करण्याच्या सुचना आहेत. तरी जिल्हयातील संबंधित क्षेत्रातील इच्छुक व्यक्तींनी आपली वैयक्तिक माहिती (बायोडाटा) दोन प्रतीत प्राणी कल्याण विषयक केलेल्या कामाच्या तपशिलासह व छायाचित्रासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, परभणी येथे दि. 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत पाठवावी. असे आवाहन परभणीचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.पी.पी. नेमाडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील गोशाळा, पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष तर प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य व सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि संबंधित जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्ते अशा व्यक्तीची सदस्य म्हणुन निवड केली जाणार आहे. अशासकिय सदस्य नियुक्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या शिफारसी विचारात घेवुन राज्य शासनाकडून नाम निर्देशनाने नियुक्ती करण्यात येणार आहे. या अशासकिय सदस्यांची नियुक्ती तीन वर्ष कालावधी करीता राहील, परंतु कोणत्याही अशासकिय सदस्याला काढून टाकण्याचे अधिकार शासनास राहतील. यापुर्वी केलेल्या आवाहनास अल्पसा प्रतिसाद मिळाल्यामुळे आता दि. 17 नोव्हेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपुर्वी मिळेल अशा रितीने माहिती पाठवावी. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-