परभणी, दि. 12 (जिमाका) :- राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी नांदेड येथून शासकीय वाहनाने जुना मोंढा पूर्णा येथे सकाळी 11.30 वाजता आगमन व राखीव. सकाळी 11.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे सुशोभिकरणाचे लोकार्पण (स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्णा). दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे लोकार्पण (स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा) दुपारी 12.30 वाजता नगर परिषद पूर्णा यांच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण (स्थळ- रेल्वे स्टेशन रोड, पूर्णा) दुपारी 1:00 वाजता छत्रपती राजे संभाजी व्यापारी संकुल यांचे लोकार्पण (स्थळ- छत्रपती संभाजी महाराज चौक, पूर्णा) दुपारी 1.05 वाजता मुख्य रस्त्याचा लोकार्पण सोहळा, दुपारी 1.15 वाजता बुध्द विहार येथे भेट (स्थळ- बुध्द विहार पूर्णा) दुपारी 1.30 वाजता पूर्णा येथून मोटारीने परभणीकडे रवाना, दुपारी 2.05 वाजता राजे संभाजी निवासी व्यायामशाळा लोकार्पण (स्थळ- रामकृष्ण नगर, वसमत रोड परभणी) दुपारी 2.20 वाजता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा (स्थळ- खासदार श्री. संजय जाधव यांचे कार्यालय) दुपारी 2.35 वाजता शिवसेना कार्यकर्ता मेळावा (स्थळ- अक्षदा मंगल कार्यालय, परभणी) दुपारी 3.15 वाजता खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी राखीव (स्थळ- बाळासाहेब ठाकरे नगर, परभणी) सायंकाळी 4.00 वाजता परभणी महानगरपालिकेतर्फे स्वागत समारंभ, सायंकाळी 4.25 वाजता आमदार सुरेश वरपुडकर यांचे निवासस्थानी राखीव, सायंकाळी 5.45 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. -*-*-*-*-