लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम पत्रकार लिखाणातून होते – प्रा.
डॉ. हनुमंत भोपाळे
अर्धापूरात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा…।
अर्धापूर ( शेख जुबेर ) चेहरा नसलेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार नेहमीच प्रयत्न करतात.समाजामध्ये ख-या अर्थाने लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम पत्रकार आपल्या लिखाणातून वेळोवेळी करतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्याख्याते प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे यांनी मंगळवारी (ता.16) राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ग्रंथभेट कार्यक्रमात अर्धापूर येथे केले.
शहरातील तालुका काँग्रेस कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त उपक्रमशील व्यक्तिमत्त्व प्रा.
डॉ.हनुमंत भोपाळे यांच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील व शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान डॉ हनुमंत मारोतीराव भोपाळे लिखित यशाचा राजमार्ग ग्रंथ भेट देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष राजु शेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, फिरदोस हुसेनी,ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत मुळे,ओमप्रकाश पत्रे,रामराव भालेराव, निळकंठ मदने,प्रा.डाँ. साईनाथ शेटोड,प्रा.डाँ. रघुनाथ शेटे,प्रा.डाँ. राजेश्वर कोटलवार आदी उपस्थित होते. सर्व पत्रकार बांधवांना यशाचा राजमार्ग ग्रंथ भेट आणि पुष्पहार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार नागोराव भांगे म्हणाले, डॉ हनुमंत भोपाळे यांनी
यशाचा राजमार्ग आम्हाला दिला. यातून आम्हाला आमचा ‘राजमार्ग’ सापडले.
पत्रकार रामराव भालेराव यांनी
पत्रकार दिनानिमित्त आमचा सत्कार करून आम्हाला प्रोत्साहन देण्यात आले.
एकमेकांना सन्मान देण्यात संस्कृती विविध होते.चांगल्या समाज निर्मितीसाठी असे होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
पत्रकार निळकंठ मदने म्हणाले,
पत्रकारिता निकोप समाज निर्मितीसाठी आवश्यक असते.
समाजातील बुध्दिवंताकडून असा कार्यक्रम आयोजित होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
डॉ.एम.के काझी यांनी
यशाचा राजमार्ग ह्या ग्रंथातील यशाचे रहस्य उलगडून दाखवले.
सर्व पत्रकारांनी खरंच हा ग्रंथ वाचायला हवा असे प्रतिपादन केले.
यावेळी पत्रकार संघाचे सचिव गुणवंत वीरकर, सखाराम क्षीरसागर, उध्दव सरोदे, प्रा.डाँ.मुख्तारोद्दिन काजी,इरफान पठाण, शेख जुबेर, शंकर ढगे,संदिप राऊत,अनिल मोळके,शेख मौला,गंगाधर सुर्यवंशी,गौरव सरोदे, गुणवंत सरोदे, आनंद मोरे,राजु पाटील पवार, नवनाथ ढगे , अमोल सरोदे
यांच्यासह पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ साईनाथ शेटोड यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा.
डॉ.रघुनाथ शेटे यांनी केले तर आभार अडव्होकेट गौरव सरोदे यांनी मानले.