
परभणी, दि. 15 (जिमाका) :- खासदार संजय जाधव यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत रामकृष्ण नगर, वसमत रोड, परभणी येथे बांधण्यात आलेल्या राजे संभाजी निवासी व्यायामशाळा व रुग्णवाहिकेचा लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज सपंन्न झाले. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजाणी दुर्राणी बालाजी कल्याणकर, गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी आंचल गोयल, महानगर पालिका आयुक्त देविदास पवार उपमहापौर भगवान वाघमारे, उपनगराध्यक्ष विशाल कदम आदी उपस्थित होते. -*-*-*-*-*-