हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण निश्चितीबाबत

आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या ना. मा. प्र. आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोमवार 15 ते गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावे. या मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ना. मा. प्र. आरक्षणाच्या फेर सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार हिमायतनगर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 15 नोव्हेंबर रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर येथे उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन केले आहे.   

00000