अमृत महोत्सवानिमित्त

रस्ता सुरक्षा अभियानाबाबत जनजागृती

नांदेड (जिमाका) दि. 17 :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा  निमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाबाबत पथनाटयाटयाद्वारे जनजागृती करण्यात आली.  या कार्यक्रमास कार्यालयामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, वाहनासंबंधी कामकाजासाठी आलेले अर्जदार कार्यालयातील नागरित उपस्थित होते. या कार्यक्रमास सुमारे 300 नागरिकांनी लाभ घेतला असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले.

 

हा कार्यक्रम फकिरा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर,नांदेड यांनी केला. या कार्यक्रमात रस्ता सुरक्षा जनजागृतीबाबतचे पथनाटय माधव वाघमारे, श्रीमती सविता सोदाम त्यांचे सहकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आले. या कार्यक्रमास अविनाश राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,संदीप निमसे, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, मनोज चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, मोटार वाहन निरीक्षक, फकिरा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर, नांदेड  चे अध्यक्ष संतोष तेलंग, अध्यक्ष उपाध्यक्ष साईप्रसाद जळपतराव, कार्यालयातील सर्व कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

0000