परभणी, दि. 17 (जिमाका) :- जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी transgender.dosje.gov.in या शासन संकेतस्थळावर ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. तरी जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या संकेतस्थळास भेट देवून ओळखपत्र मिळण्यासाठी नोंदणी करावी. तसेच नोंदणी करण्यास काही तांत्रिक अडचण आल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे भेट द्यावी किंवा समाज कल्याण कार्यालयाच्या दु.0252220595 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा तक्रार निवारण समितीच्या सचिव गीता गुठ्ठे यांनी केले आहे. -*-*-*-*-