आदिवासी मुला-मुलीना वसतीगृहात

प्रवेशासासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :– एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील आदिवासी मुलां-मुलीचे शासकीय वसतीगृह हिमायतनगर येथे शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर 30 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी  किनवट यांनी केले आहे.

वसतीगृहात विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची मोफत सोय केली जाते. त्याप्रमाणे इतर सुविधा दिल्या जातात. तरी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन  शासकीय वसतीगृह हिमायतनगर चे गृहपाल यांनी केले आहे.

000