एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गत

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :– एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गत विविध बाबीसाठी महाडीबीटी या संगणक प्रणालीवर उपलब्‍ध करुन दिले आहेत. या अभियानातर्गंत विविध बाबीसाठी शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

 

एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गत सिंचन सुविधा घटकाखाली सामुहिक शेततळे (अर्ज करताना शेतकरी गट निवडावे), शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन घटकाखाली शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टीक मल्चींग, पॅक आऊस, कांदाचाळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, कृषि यांत्रिकीकरण घटकाखाली ट्रॅक्टर (20 एच पी च्या आतील) पावर टीलर (8 एचपी च्या आतील व वरील) पावर आॉपरेटेड पॅपसॅक स्प्रेअर इत्यादी बाबींसाठी अर्ज करणे सुरु आहे. तसेच शेडनेट हाऊस मध्ये भाजीपाला बिजोत्पादन करण्यास इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांनी समुहात अर्ज करावेत.

सामुहिक शेततळेसाठी 100 टक्के , अस्तरीकरणासाठी खर्चाच्या 50 टक्के , शेडनेट हाऊस व हरितगृहासाठी 50 टक्के, प्लॉस्टिक मल्चींगसाठी 16 हजार प्रति हेक्टर, ट्रॅक्टरसाठी रुपये 1 लाख व 75 हजार, पावर टीलर साठी 75 हजार व 50 हजार रुपये. पॅक हाऊस साठी 50 टक्के 2 लाख रुपये, कांदा चाळसाठी 50 टक्के (87 हजार 500 रुपये), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीकेसाठी 50 टक्के (2 लाख 30 हजार रुपये) प्राथमिक प्रक्रीया केंद्रासाठी प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के अनुदान देय आहे. ेतरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करुन योजनाचा लाभ ध्यावा असेही कृषि विभागाकडूने कळविले आहे. 

00000