परभणी, दि. 18 (जिमाका) :- जायकवाडी प्रकल्प पैठण डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील कि. मी. 122 ते 208 मुख्य कालवा व त्यावरील सर्व वितरण प्रणाली, अधिसुचित नदी नाल्यावरील व कालव्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनाधारकानी जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यानूसार रब्बी हंगामात तिन पाणी पाळी देण्याचे नियोजन आहे. दि.23 नोव्हेंबर 2021 पासुन सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनानुसार रब्बी हंगामात पाण्यावर येणारी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदीनाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी अर्ज दि.15 डिसेंबर पर्यंत शाखा कार्यालयात दाखल करावेत. पाणी शाखा कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. मागणी अर्ज नमुना नं.7, 7-अ, मध्ये भरुन संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन परभणी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. -*-*-*-*-