परभणी, दि. 18 (जिमाका) :-महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2018 ही परभणी येथे रविवार दि.21 नोव्हेंबर 2021 रोजी दोन सत्रात एकुण 26 परीक्षा उपकेंद्रावर घेण्यात येणार असून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व दुरध्वनी, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. हे आदेश परीक्षार्थी, परीक्षेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही. रविवार दि.21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यत आदेश लागू राहतील तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्द करावे असेही आदेशात नमुद केले आहे. -*-*-*-*-