परभणी, दि. 18 (जिमाका) :- खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन दि.5 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरियाणा राज्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या 18 वर्षाखालील मुला-मुलींचे खो-खो, कबड्डी आणि बास्केटबॉल संघ पात्र ठरले आहेत. खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्र राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर स्पर्धेचे आयोजन दि.21 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान करण्यात आले आहे. तरी स्पर्धेमध्ये शाळा, कनिष्ट महाविद्यालय, क्रीडामंडळे आणि क्लब यांना सहभागी होता येईल. तरी या स्पर्धेसाठी दि.20 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रवेशिका ऑनलाईन ई-मेलद्वारे सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवाव्यात. तसेच हार्ड कॉपी सोबत घेवून येणे व कार्यालयात जमा करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय खेळाडूंना निवड चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-