परभणी, दि.22 (जिमाका) :- औरंगाबादचे विभागीय उपायुक्त तथा रोल ऑब्झर्व्हर जगदीश मणियार यांनी परभणी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेस भेट दिली. यावेळी तहसिलदार डॉ.संजय बिरादार, नायब तहसिलदार वंदना मस्के, लक्ष्मीकांत खळीकर, अव्वल कारकुन सुरेखा टाक, शिवाजी शिंदे, महसुल सहाय्यक, बीएलओ, तहसिल कर्मचारी व निवडणूक ऑपरेटर यांची उपस्थित होती. भेटीदरम्यान ऑनलाईन प्राप्त फॉर्म क्र.6,7,8 व 8-अ चे सुपरचेकींग आदी निवडणूक कामे व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेतला तसेच बीएलओ यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बीएलओंना जास्तीत जास्त गरुडा ॲपचा वापर करण्याचे सांगितले तसेच मतदारांनी व्होटर हेल्पलाईन ॲप वापरावा याबाबत जनजागृती करावी असेही सुचित केले. असे तहसिलदार, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-