परभणी, दि.22 (जिमाका) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बीटीआरआय विभाग परभणी यांच्यातर्फे टाटा मोटर्स, फियाट इंडिया ऑटोमोबाईलस पुणे या कंपन्यासाठी आयटीआय उत्तीर्ण व 6 महिन्याचा अनुभाव असलेल्या 18 ते 28 दरम्यान वयोगटातील उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. तरी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांनी मेळाव्यास दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे उपस्थित राहावे. असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र यांनी केले आहे. -*-*-*-*-