परभणी, दि.22 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाने दि.17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये परभणी जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतीमधील 66 रिक्त सदस्य पदांकरीता पोट निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून आदेशाच्या दिनांकापासून पोट निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू केली आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचा निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करणे सोमवार दि.22 नोव्हेंबर 2021, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करणे दि.30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत राहील. नामनिर्देशपत्राची छाननी दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते छाननी संपेपर्यंत राहील. निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द गुरुवार दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर करण्यात येईल. मतदानाचा दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राहील. मतमोजणी दि.22 डिसेंबर 2021 रोजी करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि.27 डिसेंबर 2021 राहील. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-