परभणी, दि.22 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी दि.17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रकान्वये परभणी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकुण 18 जागेवर पोट निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात केला आहे. पोटनिवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करणे, दि.30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशपत्रे मागविणे व सादर करणे, दि.7 डिसेंबर रोजी छाननी करणे, दि.9 डिसेंबर नामनिर्देशनपत्र मागे घेणे, दि.9 डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि.21 डिसेंबर 2021 रोजी मतदान, तर मतमोजणी दि.22 डिसेंबर रोजी होईल. निवडणूक निकालाची अधिसुचना दि.27 डिसेंबर 2021 रोजी अंतिम प्रसिध्द करण्यात येईल. परभणी तालुक्यातील गोविंदपुर/सारंगपुर एकुण जागा दोन-2 प्रभाग 3 व 2, डफवाडी एकुण जागा-2 प्रभाग-1 व 2, इस्माईलपुर-एकुण जागा 2 प्रभाग 1 व 3, पांढरी एकुण जागा 1 प्रभाग 2, हिंगला एकुण जागा 1 प्रभाग 1 वरपुड एकूण जागा 3 प्रभाग-1, 3, 3, साडेगाव एकुण जागा 1 प्रभाग 4, सुरपिंपरी एकुण जागा 1 प्रभाग 3, रायपुर एकुण जागा 1 प्रभाग 3, सनपुरी एकुण जागा 1 प्रभाग 1, धसाडी एकुण जागा 1 प्रभाग क्रमांक 1, टाकळी बो ए कुण जागा 1 प्रभाग क्र.3, तट्टूजवळा एकुण जागा 1 प्रभा क्र.2 एकुण 18 अशी संख्या आहे. निवडणूक कार्यक्रमानूसार निवडणूक असलेल्या ग्रामपंचातीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागु राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिला कालावधीत कुठेही करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत. असे तहसिलदार, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-