परभणी, दि. 25 (जिमाका):- जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 10+1 शेळीगट पुरवठा/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट, 100 एकदिवसीय कुक्कुट पिल्ले वाटप योजनेमधील तालुकास्तरावरुन प्रापत झालेल्या पात्र धारकांच्या यादीमधून संगणकीय पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय निवड समितीची सभा जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष डॉ.पी.पी.नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांच्या कार्यालयातील सभागृहात बुधवार दि.1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेली आहे. तरी सबंधित लाभार्थ्यांनी वेळेवर हजर राहावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे. -*-*-*-*-