*उत्कृष्ठ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्रा. डॉ. रघुनाथ शेटे यांना प्रदान*
अर्धापूर /शेख जुबेर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी सन 2019 – 20 या वर्षाचा पुरस्कार प्रा. रघुनाथ शेटे शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूर यांना दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी स्वारातीम विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी व कुलगुरू डॉ.उद्धवजी भोसले यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन ,कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे,परिक्षानियंत्रक डॉ.रवी सरोदे,विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.ज्ञानोबा मुंढे ,रासेयो संचालक डॉ.शिवराज बोकडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा.रघुनाथ शेटे हे मागील दहा वर्षापासून रासेयो कार्यक्रमाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी दहा वर्षात अनेक आरोग्यशिबिर,रक्तदान शिबिर,वनराई बंधारे,शौचालय बांधकाम,स्वच्छता कार्यक्रम, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना, दुष्काळ ग्रस्तांना, सैनिकांना निधीसंकलन,मतदार जनजागृती कार्यक्रम या सारखी समाजाभिमुख व राष्ट्रीय कार्याचे उपक्रम रासेयो च्या माध्यमातून राबवले आहेत .त्यांच्या कार्याची पावती म्हणून विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ठ कार्यक्रमाधिकारी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव डी
पी.सावंत,सहसचिव ऍड. उदयराव निंबाळकर,कॊषाध्यक्ष प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के.पाटील व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, यांनी प्रा रघुनाथ शेटे यांचे अभिनंदन केले.
उत्कृष्ठ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम ाधिकारी पुरस्कार प्रा. डॉ. रघुनाथ शेटे यांना प ्रदान
