परभणी, दि.02 (जिमाका) :- जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषि उत्पन्न बाजार समिती, नागरी सहकारी बँक, नागरी तसेच कर्मचारी पतसंस्था यांच्या आस्थापनांना व त्यांच्या अभ्यागतांना संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शक सुचनानूसार कोविड -19 चे पालन करणेसाठी Covid Appropriate Behavior (CAB) च्या अनुषंगाने लसीच्या दोन्ही मात्रा घेणे, 6 फूट शारीरिक अंतर राखणे, सॅनीटायझरचा आणि मास्क नियमित वापरणे, आवश्यतेनूसार फेस शिल्ड वापरणे अनिवार्य करण्यासाठी सुचित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बॅक, नागरी व कर्मचारी पतपेढी यांनी त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी –कर्मचाऱ्यांना लसीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. तसेच सेवा घेणाऱ्या ग्राहक, सभासंदानी किमान एक डोस घेतलेला असावा त्यानूसार लसीकरणास पात्र लाभार्थ्याचे 100 टक्के ( प्रथम मात्रा ) झालेली पाहिजे. लसीकरणाचा दुसरा डोस कोविशिल्ड 84 दिवस व कोवॅक्सिन 28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. पहिल्या डोसचा कालावधी समाप्त झाला असेल तर दूसरा डोस घेणे बंधनकारक असेल. संबंधित ग्राहकाची नोंद नोंदवहीत घेऊन त्यांचे नाव, आधार क्रमांक आणि लस घेतल्याचा तपशिलाची नोंद घेण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषि उत्पन्न बाजार समिती, नागरी सहकारी बँक, नागरी व कर्मचारी पतसंस्था यांच्या आस्थापना यांना लसीकरणाचे बोर्ड लावणे व कोविड नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केली आहे. तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाकडून नियुक्त पथकास नोंदवहीचा तपशिल तपासणीसाठी उलपब्ध करुन देणेसाठी देखील सूचित केलेले आहे. या आदेशाचे उल्लघंन केल्यास तपासणी पथकाकडून पुढीलप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तींनी कसुर केल्यास प्रत्येक प्रंसगी 500 रुपये दंड आकारण्यात येईल.ज्यांनी आपल्या अभ्यागत, ग्राहक ई. वर कोविड अनुरुप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतीरिक्त अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा 10 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापनांचे अभ्यागत, ग्राहक इत्यादीमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत: कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा प्रमाण कार्य चाललेल्या कार्यपध्दतीचे पालन करण्यास कसूर केले तर प्रत्येक प्रंसगी 50 हजार रुपये इतक्या दंडास पात्र असेल वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी कळविले आहे. -*-*-*-*-