परभणी, दि. 03 (जिमाका) :- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून अनुचित प्रकार घडू नये याकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सोमवार दि.6 डिसेंबर 2021 रोजी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2 सीएल,एफएल,टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री करण्यास बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद केले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News