परभणी, दि.03 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरीता मार्जीन मनी योजना सुरु केली आहे. योजनेचा शासन निर्णय संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक नवउद्योजकांनी अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे. -*-*-*-*-