परभणी,दि.05 (जिमाका) :- जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व समस्या सोडवण्यातयेतील तसेच येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्याला प्राधान्य देवून सर्व सुविधा देण्यातयेतील. सामान्य माणसाला शुन्य शुल्कात  अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधामिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आरोग्य सुविधांना प्रथम प्राधान्य देणेगरजेचे होते तरी कोरोनाने माणसाला जीवनाचे महत्व कळाले आहे. नवीन व्हेरिएंटओमिक्रॉन हा तेवढा घातक नसून यामध्ये कोव्हिड-19च्या नियमांचे तंतोतंतपालन करणे गरजेचे झाले आहे. मराठवाड्यातील डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आली असूनयेत्या काही महिन्यात मराठवाड्यातील सर्व तालुकास्तरावरील रुग्णालयात रुग्णांनाअत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. असे प्रतिपादन राज्याचेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.           परभणी येथीलसुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या शुभांरभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळीखासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर, जि.प.उपाध्यक्ष अजय चौधरी,माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार मधुसूदनकेंद्रे, प्रताप देशमुख, डॉ. मुंजाभाऊधोंडगे, डॉ. परमेश्वर जाधव व डॉ.शितल जाधव,  महापालिकाआयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.           आरोग्य मंत्रीश्री. टोपे म्हणाले की, काही महिन्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णांना उत्तमोत्तमसुविधा मिळणार असून सोनोग्राफी, एमआरआय आणि सिटीस्कॅनचीसुविधा येणाऱ्या सहा महिन्यात तालुक्यातील रुग्णालयात उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच  परभणीतईएसआयएसचे हॉस्पिटल आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मेडिकल कॉलेजसाठीऔपचारिक ती सर्व प्रक्रिया झाली असून लवकरच मंत्रीमंडळ बैठकीच्यानंतर प्रत्यक्षकामाला सुरुवात होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.  सामान्यनागरिकांना शुन्य शुल्कात उपचार मिळावेत यासाठी राज्यस्तरावर योजनेची आखणी केलीजात असून यातून आरोग्याच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाने कातटाकली असून नव्या दमाने सेवा नागरिकांना दिली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकलकॉलेज झाल्यास मराठवाडा आरोग्या सुविधाच्या दृष्टीने स्वावलंबी होईल असेही त्यांनीयावेळी सांगितले. परभणी जिल्ह्यात लसीकरणाला गती मिळणे गरजेचे असून लस ही कवचकुंडलअसल्याने आरोग्य विभागासह ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वलोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपापल्या क्षेत्रातील व्यक्तींचे कोविड प्रतिबंधात्मकलसीकरण पुर्ण करुन घ्यावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.           यावेळी माजीखासदार सुरेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आमदार सुरेश वरपुडकर वखासदार संजय जाधव यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास रुग्णालयातीलडॉक्टर्स, नागरिक, पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कॅथलॅब व कार्डियाक डायग्नोस्टिक सेंटरचेदीपप्रज्वलन करुन व फित कापुन उदघाटन केले. तर वसमत रोडवरील डायग्नोस्टिक सेंटर व परभणीमेडिकल व सर्जिकलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून तेथील उपकरणांची माहिती जाणूनघेत रुग्णांना चांगल्या सुविधा द्याव्यात. अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी मान्यवरआणि नागरिकांची उपस्थिती होती. -*-*-*-*-