इच्छूक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत

पुरावा सादर करण्यासाठी आज  12 वाजेपर्यत मुदत

नांदेड (जिमाका) दि.6 :- राज्य निवढणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोट निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत 6 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यत वाढविण्यात आली. तथापि उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा सादर करण्याची मुदत मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजेपर्यत मुदत वाढवून देण्यात आली आहे असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.

0000