अर्धापूरच्या जनतेच ना.अशोकराव चव्हाण यांच्या शाश्वत विकासावर विश्वास….
अर्धापूर नगरपंचायतीत काँग्रेसची एकहाती सत्ता येणार…..
उपमहापौर अब्दुल गफ्फार

अर्धापूर ( शेख जुबेर )

भोकर मतदार संघातील अर्धापूर तालुक्यातील जनतेचे लोकनेते ना. अशोकराव चव्हाण यांच्या शाश्वत विकास कार्यावर पूर्ण विश्वास असून जनता काँग्रेसचे सर्व नगरसेवकांना निवडून देणार असे प्रतिपादन अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीचे काँग्रेस पक्ष निरीक्षक तथा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उपमहापौर अब्दुल गफ्फार यांनी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना उपमहापौर अब्दुल गफ्फार म्हणाले की माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना नांदेड सारख्या मोठ्या महानगरपालिकेचे उपमहापौर पद ना.अशोकराव चव्हाण यांनी दिले. साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमी न्याय देण्याची भूमिका घेतात आणि जे बोलतात ते करून दाखवतात. अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी सदैव राहतात, सरकारच्या माध्यमातून शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी ना.अशोकराव चव्हाण साहेबांनी दिला, असे ते बोलत होते. अर्धापूर शहरातील अल्पसंख्यांक समाज जातिवादी पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास भरघोस मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला.