परभणी, दि.13 (जिमाका):- कोव्हिड -१९ या आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा . सर्वोच्च न्यायालयाने दि .०४.१०.२०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार , महसूल व वन ( आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन ) विभागाने शासन निर्णय क्र . सीएलएस / २०२१ / प्र.क्र .२५४ / -३ , दि . २६.११.२०२१ अन्वये प्रसारीत केला आहे . या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून याद्वारे कोव्हिड -१ ९ या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित नातेवाईक यांनी mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील . तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे . अर्जदार हे राज्य शासनाने वरील विकसित केलेल्या वेब पोर्टलवर स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC – SPV मधून अर्ज करु शकतात. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे. अर्जासोबत १ ) अर्जदाराचा स्वतःचा तपशील , आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक २ ) अर्जदाराचा स्वत : चा बँक तपशील ३ ) मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील ४ ) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम , १ ९ ६ ९ खालील मृत्यू प्रमाणपत्र ५ ) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र आदी कागदपत्रे व माहिती सादर करणे बंधनकारक राहील. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र . सार्वजनिक आरोग्य विभाग , न्यायिक -२०२१ / प्र.क्र .४८८ / आरोग्य -०५ , दिनांक १३ ऑक्टोबर , २०२१ अन्वये जिल्हास्तर / महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणाची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील . अर्ज अंतिमतः मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील . सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज ७ दिवसांकरिता वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील , जेणेकरून मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल . जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार , संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-