परभणी, दि.14 (जिमाका) :- लगतच्याळ लातूर जिल्ह्या मध्ये् ओमिक्रॉन व्हे रियंटचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. संभाव्य कोव्हीड-१९ तिस-या लाटेमध्येू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यािसाठी प्रतिबंधात्म क उपाययोजनेच्या‍ अनुषंगाने तसेच ओमिक्रोन व्हेारियंटचा जिल्ह्या मध्येा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहून विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्या त विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्या त कोविड-19 लसीकरणाचे काम वेगाने चालू असून या लसीकरणासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्राची व्यीवस्थाक केलेली आहे. तरी नागरिकांनी जवळच्याठ लसीकरण केंद्रावर जाऊन कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घ्याणवे. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. नागरिकांनी सार्वजनिक स्थळी मास्कचा तसेच वेळोवेळी हँड सॅनिटायझरचा वापर करावा, शारीरिक अंतर राखावे, अवाजवी गर्दी व गर्दीत जाणे टाळावे, जिल्ह्यातील सर्व आस्थापना, संस्था यांनी मास्क, हँड सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर इत्यादी नियमाचे कोटकोरपणे पालन करावे. परभणी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी जसे दुकाने, बाजार परिसर, खाजगी शिकवणी वर्ग, मंगल कार्यालय, फंक्शन हॉल व ईतर कार्यक्रमाच्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी करु नये. जिल्ह्या त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्या्साठी प्रतिबंधात्मदक उपाययोजना म्ह णून परदेशातून जिल्ह्या्त प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी स्वणतः आपली माहिती स्थाेनिक पातळीवरील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. तसेच स्वसतःची वैद्यकीय तपासणी करुन घ्यानवी. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-