परभणी, दि.15 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश देणे सुरु आहे. तरी जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते दहावीचे शालेय विद्यार्थी, अकरावीनंतर तसेच पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज प्रत्यक्ष सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी केले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News