परभणी, दि.16 (जिमाका) :- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी आवास सॉफ्ट प्रणालीमधून प्राप्त एसजीपीएल याद्यामधून घरकुल लाभ देण्याबाबतच्या निकषानूसार पात्र व अपात्र लाभार्थी याद्या ग्रामसभेच्या मान्यतेने तयार करण्यात येत आहेत. तरी ग्रामस्थांनी आवास प्लस सर्वेक्षणाअंतर्गत एसजीपीएल यादीमधील कुटुंबापैकी घरकुल लाभ देण्यास पात्र व अपात्र कटुंब वगळण्यासाठी ग्रामसभेत सहभागी व्हावे जेणेकरुन ग्रामसभेत गरजू व पात्र कुटुंबाना लाभ देण्याच्या अनुषंगाने पात्र कुटुंबाची निवड तसेच अपात्र कुटुंबाची वगळणी पारदर्शक पध्दतीने पुर्ण करता येईल. ग्रामसभेत प्रपत्र अ-संवर्गनिहाय सिस्टीम जनरेटेड प्राधान्य यादी, प्रपत्र ब-ग्रामसभेने मंजूर झालेल्या संवर्गनिहाय पात्र कुटुंब प्राधान्यक्रम यादी आणि प्रपत्र क- ग्रामसभेने अपात्र केलेल्या संवर्गनिहाय कुटुंबाची यादी ग्रामस्तरावर सात दिवस प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तरी पात्र व अपात्र कुटुंबांनी आक्षेप असल्यास तालुका गटविकास अधिकारी यांच्याकडे पंधरा दिवसाच्या आत तक्रार दाखल करावी. असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर व अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News