परभणी, दि.16 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या स्टँडअप योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली असून यासाठी दि.17 डिसेंबर 2021 रोजी मेळाव्याचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परभणी येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र नवउद्योजकांनी उपस्थित राहून केंद्र शासनाच्या स्टँडअप योजनेबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी मेळाव्यास उपस्थित रहावे. असे आवाहन परभणी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी केले आहे. -*-*-*-*-