परभणी, दि.16 (जिमाका) :- राज्यातून युरोपियन युनियन आणि इतर देशामध्ये द्राक्ष निर्यातीसाठी अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम बागेची नोंदणी होते. निर्यातक्षम द्राक्ष बाग नोंदणीचे काम सुरु असून दि.20 डिसेंबर 2021 पर्यंत त्यास मुदतवाढ दिली आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बागांची नोंद करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे यांनी केले आहे. द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी, किड आणि रोगमुक्त हमी ॲगमार्क प्रमाणिकरण फायटोसॅनीटरी प्रमाणिकरण या बाबी ग्रेपनेट प्रणालीद्वारे होते. निर्यातक्षम बागांची नोंदणी, नुतनीकरण करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-