परभणी, दि.28 (जिमाका) :- कळमनूरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांचा समावेश असून भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती इत्यादी मंजूरीची कार्यवाही या कार्यालयाकडून केली जात असते. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेसाठी अर्ज शासनाच्या https://mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळावर दि.31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावेत. संकेतस्थळावरील तांत्रिक समस्यासाठी टोल फ्री क्र.022-49150800 यावर संपर्क साधावा. असे आवाहन कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News