जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक; प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा

– जिल्हाधिकारी आंचल गोयल परभणी, दि.28 (जिमाका) :- जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील अत्याचाराच्या प्रकरणात पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणाच्या तपासाला गती देत प्रकरणे तात्काळ निकाली काढा. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी समितीचे अशासकीय सदस्य प्रल्हादराव अवचार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे, प्र. पोलिस उपअधिक्षक प्रकाश राठोड, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करण्यावर तपासावर असलेल्या गुन्ह्याचा गोषवारा जाणून घेत न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणांचा आढावा घेवून योग्य त्या सुचना केल्या. बैठकीच्या प्रांरभी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली माहे नोव्हेंबर 2021 मध्ये एकुण 7 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 7 गुन्हे पोलिस तपासावर आहेत. तर माहे नोव्हेंबर 2021 अखेर एकुण 84 गुन्हे पोलिस तपासावर आहेत. सन 2021-22 या आर्थिक वर्षात 67 प्रकरणातील 77 पीडित लाभार्थ्यांना 65 लक्ष एवढ्या तरतुदीची आवश्यकता असल्याने प्रादेशिक उपायुक्त औरंगाबाद यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी यावेळी दिली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. -*-*-*-*-