परभणी, दि.28 (जिमाका) :- जिल्हास्तरीय खेलो इंडिया टेबल टेनिस केंद्रात क्रीडा मार्गदर्शकाची निव्वळ मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रशिक्षकाला प्रती महिना 15 ते 25 हजार रुपये याप्रमाणे मिळेल. प्रशिक्षकांचा पर फॉर्मन्स आढळुन न आल्यास त्यास परभणी जिल्हास्तर खेलो इंडिया केंद्र नियंत्रक व देखरेख समिती कधीही प्रशिक्षक पदावरुन दुर करु शकेल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी येथे संपर्क साधावा. पात्रताधारक प्रशिक्षकांनी आपले अर्ज क्रीडा कार्यालयाच्या dsopbn99@gmail.com या ई-मेलआयडीवर आणि त्याची मुळ प्रत कार्यालयीन वेळेत परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात गुरुवार दि.30 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. -*-*-*-*-