परभणी, दि.29 (जिमाका) :- भारत सरकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने मा.पंतप्रधान यांच्या हस्ते शेतकरी उत्पादक संस्था यांना समभाग निधी योजनेअंतर्गत निधी वितरण करणे, शेतकरी उत्पादक संस्थेच्या शेतकऱ्यांशी संवाद साधणे तसेच पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दहाव्या हप्त्याचा लाभ वितरीत करण्यासाठी शनिवार दि.1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्यावेळी मा.पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी किसान, डीडी नॅशनल (राष्ट्रीय दुरदर्शन) वर केले जाईल तसेच थेट वेबकास्ट pmindiawebcast.nic.in वर देखील उपलब्ध राहणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. -*-*-*-*-