परभणी, दि.27 (जिमाका) :- परमीट ऑटोरिक्षा घेतलेल्या वाहनधारकांनी एपी मालिकेत नोंदणी झालेल्या काही ऑटोरिक्षा धारकाने नोंदणी दिनांकापासून आजपर्यंत परवाना शुल्क 10 हजार रुपये भरलेले नाही.

अशी वाहने रस्त्यावर वाहतुक करीत असलेल्या वाहनधारकांनी तात्काळ परवाना फीस भरण्यात यावी. अन्यथा लवकरच पोलिस विभाग व आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अशा परवाना नसलेल्या वाहनांवर सुधारित नियमाप्रमाणे 20 हजार रुपये दंड

आकारण्यात येवून वाहन जप्तीची कारवाई करण्यात येईल. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे. -*-*-*-*-