परभणी,(जिमाका)दि. 27:- परभणी तालूक्यातील मौ. जोडपरळी पूर्णा नदी पात्रालगत अंदाजे 6 ब्रास, मौजे उखळद येथील उखळद येथील पुर्णा नदीच्यावर जुने उखळद गावठानलगत नदीत जाणाऱ्या रस्त्यालगत अंदाजे 30 ब्रास अवैध रेती साठ्याचा मंगळवार, दि. 28 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय, परभणी येथे जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या रेती साठ्यासाठी ज्यांना लिलावात भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी अटी व शर्तीस अधीन राहून लिलावात सहभागी होता येईल. अशी माहिती परभणीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. जप्त रेती साठ्यातील रेती खरेदीसाठी लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास इच्छुकांनी दि. 28 डिसेंबर 2021 रोजी अटी व शर्तीच्या अधिन राहून लिलावात बोली बोलता येईल. सरकारी किमतीच्या एक चर्तुतांश रक्कम लिलाव सुरु होण्यापुर्वी लिलावात भाग घेणाऱ्यांकडून घेण्यात येईल. लिलावधारकांना रेती वाळूसाठा जेथे आहे व जसा आहे अशा स्थितीतच घ्यावा लागेल. सदरील रक्कम भरणा केल्याशिवाय लिलाव अंतीम केला जाणार नाही. लिलाव झालेल्या दिवसापासून एका महिन्याच्या आत स्वखर्चाने वाळुसाठा ठिकाणावरुन उचल करावा लागे. लिलाव धारकांने सपुर्ण रक्कम भरावी लागेल. शासन आदेशानुसार जीएसटी कराचा भरणा करणे बंधनकारक असेल. बोली लावून साठा घेवून संपुर्ण रक्कम भरणा न केल्यास संबंधितांविरुध्द फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. अपेक्षित रेतीसाठ्याच्या प्रमाणात वाहतूक पासेस लिलावधारकास दिल्या जातील. विहीत कालावधीत साठ्याची उचल न केल्यास फेरलिलाव करण्यात येईल. जशास तशा स्थितीमध्ये रेतीसाठा घ्यावा लागेल. लिलावात भाग घेणाऱ्यांकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, टॅनकार्ड असणे आवश्यक आहे. लिलावधारकाने गौण खनिज विकास प्रतिष्ठाणची 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल. साठवणूक केलेल्या वाळु साठयाच्या जागेचा अकृषिक कर भरणा करणे आवश्यक राहील. कार्यालयाच्या दर्शविलेल्या पत्त्यावर लिलावात बोली बोलणाऱ्यांची जबाबदारी राहील. लिलाव अंशत: अथवा पुर्णत: रद्द करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकारी, परभणी यांचे राहतील. रेती साठ्याची रक्कम भरणा केल्यानंतर 3 दिवसात रेती वाहतुक पासेसकरीता जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांच्याकडून वाहतुक पासेस हस्तगत करावेत. कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे स्वत: मास्कचे परिधान करुन उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंग नियम पाळावेत. तसेच वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. असे परभणीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News