परभणी, दि.27 (जिमाका) :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पुर्वसुचना दिली नव्हती त्या शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारीत महसूल मंडळनिहाय नुकसान भरपाई लागु झाल्यास पीक विमा वाटप करण्यात येईल. नुकसानीची पुर्वसुचना दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पिक विमा मिळालेला नाही त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरात लवकर पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होईल. तरी विमाधारक शेतकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी केले आहे. -*-*-*-*-