परभणी, दि.31 (जिमाका) :- जिल्ह्यातील आगामी उत्सवाचा कालावधी लक्षात घेता वर्ष 2022 मध्ये 2 दिवस राखीव ठेवुन उर्वरित 13 दिवसांसाठी पुढीलप्रमाणे फक्त ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सुट जाहीर करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत. शिवजयंती, ईद-ए-मिलाद , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , 1 मे महाराष्ट्र दिन यांना प्रत्येकी एक दिवस तर गणपती उत्सव 4 दिवस ( दुसरा दिवस पाचवा दिवस, गौरीविसर्जन व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव 2 दिवस (अष्टमी व नवमी), दिवाळी लक्ष्मीपूजन एक दिवस, 31 डिसेंबर एक दिवस, ख्रिसमस एक दिवस, आणि उर्वरित 2 दिवस राज्य शासनाच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी परभणी जिल्ह्याच्या हद्दीपुरती मर्यादित राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News