परभणी, दि. 3 (जिमाका) :- रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाची दि.4 ऑक्टोबर 2021 रोजीची अधिसुचना क्र.जी.एस.आर.714 (इ) अन्वये केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 च नियम 81 मध्ये सुधारणा करुन विविध शुल्कात वाढ केली आहे. या सुधारणा दि.1 एप्रिल 2022 पासून अंमलात येणार आहेत. वाहनधारक व जनतेच्या माहितीसाठी अधिसुचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-