अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा

केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 7  :-  अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 रविवार 9 जानेवारी 2022 रोजीसकाळी 11 ते सायं. 5 या कालावधीत किडस् किंगडम पब्लिक स्‍कूल, गट नं. 100, मालेगावरोड, नांदुसारोड खुरगांव नांदेड  पिनॅकल इंटरनॅशनल स्‍कूल काकांडीतर्फे, साई लॉन पासदगाव नांदेड या दोन परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये म्हणून तसेच परीक्षा ही स्वच्छ व सुसंगत पार पाडणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात रविवार 9 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून सायं. 7 वाजेपर्यतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. वर दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000