परभणी, दि.7(जिमाका): जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्ण संख्येत नियमितपणे वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू नये याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तरी जिल्ह्यात कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत. साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्रापत अधिकारातून परभणी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा दि.31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त व शिक्षणाधिकारी यांच्यावर राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. **** वृत्त क्र.:09