परभणी, दि.8 (जिमाका):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दि. ९ , १० व ११ जानेवारी २०२२ या तीन दिवसांमध्ये १५ ते १८ वयोगटातील सर्व मुला- मुलींचे लसीकरण करण्याची विशेष मोहीम हाती घेऊन या तीन दिवसामध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण करावयाचे आहे . त्यासाठी सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी , केंद्रप्रमुख , तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधिकारी यांची तात्काळ व्हीडीओ कॉन्फररन्सद्वारे बैठक घेऊन सदर वयोगटातील मुला- मुलींचे लसीकरण १०० % पूर्ण करणे बाबत सूचना दिल्या आहेत. सदर तिन दिवसामध्ये जरी शाळा बंद असल्या तरी लसीकरणासाठी मुला- मुलींना शाळेत बोलावुन लसीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांनी दिली आहे. -*-*-*-*-