परभणी,दि.07(जिमाका): राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब म‍लिक यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, 09 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीच्या बैठकीचे ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परंतू सद्यस्थितीत कोरोना साथरोगाचा वाढत्या प्रादूर्भावामुळे सदर बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पालकमंत्री नवाब मलिक यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-